माहितीच्या कायद्याअंतर्गत माहिती
 
Dr. Waldemar Mordecai Haffkine
 
हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परेल, मुंबई - ४०००१२.
 

१) कार्यालयाची रचना, कार्ये आणि कर्तव्ये :

हाफकीन संस्थेची स्थापना सन १८९९ साली झाली, प्लेगवर परिणामकारक लस शोधून काढणारा महान शास्त्रज्ञ डॉ. वाल्देमार मॉरदेकाय हाफकीन यांचे नाव संस्थेला देण्यात आले असून देशामधील अशा प्रकारच्या जुन्या अग्रगण्य संस्थांमधील ही एक संस्था आहे.

आपल्या देशातील पहिली वहिली फेज -१ क्लिनीकल ट्रायल घेण्याचा बहुमान या संस्थेच्या संस्थापकांकडे जातो.

संस्थेची सध्याची वास्तू, जेथे काळी ब्रिटिश गव्हर्नरचे निवासस्थान होते, दि. १० ऑगस्ट १८९९ रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड सॅडहर्स्ट यांनी डॉ. वा. हाफकीन यांना त्यांच्या संशोधनाच्या कामाकरिता औपचारिक रित्या उपलब्ध करून दिली.

आज हाफकीन संशोधन संस्थेचा एक डेरेदार वटवृक्ष झाला असून अनेक संसर्गजन्य रोगांवर विषाणूशास्त्र, सूक्ष्मजीव शास्त्र औषध शास्त्र, चिकीत्सालयीन विकृतीशास्त्र, जीवरसायन शास्त्र, प्रतीक्षमताशास्त्र, प्राणीजन्य-मानवी-रोगशास्त्र, रसायनोपचार, वनस्पती रसायनशास्त्र, विषविज्ञान, आदी विविध शास्त्रांधारे संशोधन करणार्‍य र्‍या अद्ययावत आणि बहू-आयामी अशा जीव-वैद्यक संशोधन संस्थेचे स्वरूप तिने धारण केले आहे.

ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेकरिता (WHO) प्लेगसाठी संशोधन प्रयोगशाळा म्हणून ही कार्य करते.

प्राणीजन्य मानवी रोगशास्त्र विभागात उंदीर आणि तत्सम प्राण्यांची "येर्सिनीआ" जंतूंसाठीची अनुहृषता अभ्यासण्यात येते. कॉलर्‍याच्या जंतूंवर देखील (susceptibility) येथे सखोल अभ्यास करण्यात येतो. अगदी मायक्रोमॉल्युक्युलर स्तरापर्यंत व्हीब्रीओच्या विविध स्ट्रेन्सच्या वाढीं विषयक गरजांचा संशोधनपूर्ण अभ्यास यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे.

हाफकीन संस्थेचे कार्यक्षेत्र प्रशिक्षण, संशोधन आणि रासायनिक व विश्लेषणात्मक चांचण्या अशा तीन मुख्य विभागांमध्ये विभागण्यात आले आहे. संस्थेच्या सद्य संशोधन विषयांमध्ये विषयांमध्ये एड्सग्रस्त रुग्णांमधील सांसर्गिक रोगांच्या प्रादुर्भावांचा अभ्यास, एफ एम डी लसीमध्ये सुधारणा, टायफाईडची सूक्ष्मजीवशास्त्रीय विश्लेषणात्मक परीक्षा आणि संनिरीक्षण आणि प्राणिजन्य रोगांशी लढा देऊ शकतील अशा नव्या रसायनोपरी अभिकृत्यांचा निरंतर विकास करणे अशा सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

लेप्टोस्पायरॉसीस, मलेरिया, डेंग्यू, इत्यादीसारख्या रोगांच्या निदानात्मक अभ्यासाकरिता नुकतीच एका अद्ययावत आणि आधुनिक प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा शासकीय, म्युनिसिपल व इतर रूग्णालयांना सेवा पुरविते. तसेच वनस्पतिजन्य रासायनिक पदार्थांच्या (फायटोकेमिकल्स) इनव्हिट्रो एच आय व्ही प्रतिबंधक चांचण्याही घेते. ह्या प्रयोगशाळेने एच आय व्ही विषाणूभार आणि ड्रग रेसिस्टन्ससाठी एक किफायतशीर आणि सोपी पद्धत विकसित केली आहे.

जीव वैध्यक शास्त्रातील एक अग्रणी शिक्षण संस्था म्हणून संस्थेचा नाव- लौकिक असून एम. एस. सी. (सूक्ष्मजीवशास्त्र) आणि एम. डी. (पी. एस. एम.) सारख्या पदव्युत्तर अभ्यास- क्रमांकरिता मुंबई विद्यापीठाशी संस्था संलग्न आहे. शिवाय संस्था वेळोवेळी औषधी आणि आरोग्याशी संबंधीत इतर उत्पादनांसाठीच्या विशेष चांचण्यांसाठीचे उपक्रम आणि प्रकल्प वेळोवेळी हाती घेते. मुंबई विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांच्या एम. एस. सी., एम. टेक आणि बी. एस. सी. विद्यार्थ्यांकरिता संस्था दरवर्षी बायोटेक्नॉलॉजी प्रशिक्षण कार्यक्रम राबविते आतापर्यंत २७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सदर क्षेत्रातील आधुनिक संशोधन पद्धतीच्या ज्ञानाचा लाभ प्राप्त करवून देण्यात आहे.

संस्थेच्या सर्व शास्त्रीय कामकाजात मोलाचा आधार असणारे संस्थेचे ग्रंथालय आधुनिक सोयी- सुविधांनी परिपूर्ण असून तीच्या अवाढव्य संग्रहामध्ये ग्रंथ, नियतकालिके, मोनोग्राफ्स आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील संदर्भ साधनांचा समावेश आहे.

सर्वसामान्यांच्या मनामध्ये असलेले सर्पांविषयीचे गैरसमज आणि भीती दूर करण्याच्या हेतूने सन १९३८ साली स्थापन करण्यात आलेले संस्थेचे सर्पालय नियमितपणे सर्पाविषयीचे जनजागृती कार्यक्रम राबविते आणि नैसर्गिक विविधता व निर्सगाचा समतोल राखण्याकरिता सर्पांचे महत्त्व तसेच माणसाला असलेली त्याची उपयुक्तता याबाबत लोक शिक्षणाच्या माध्यमातून सर्व- सामान्य जनतेला शिक्षित करते.

हाफकीन संस्थेच्या संशोधनामध्ये संसर्गजन्य संशोधनास नेहमीच अग्रकम देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने संशोधन कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते आणि त्यामुळे संस्था राज्य आणि केंद्र स्तरातील सार्वजनिक आरोग्य विभागांशी निकट सहकार्याने कार्य करते.

समाज रचनेमध्ये मानवोपयोगी चिरस्थायी बदल घडवून आणला हा जीव वैद्यक शास्त्रांमधिल संशोधनाचा एक प्रधान हेतू होय. विकसनशील राष्ट्रांमधील आम चर्चेची एक बाब म्हणजे जीव वैद्यक शास्त्रांमध्ये प्रगती साधण्यासाठी आपण किती प्राधान्य देतो.

हाफकीन संस्थेने समाजाच्या प्रत्यक्ष गरजांसंबंधाने संशोधनामध्ये अग्रक्रम द्यावयाच्या बाबी निश्चित केल्या असून तिच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी विज्ञानाची कास धरून अहोरात्र संशोधन आणि अभ्यास करून आपल्या लाखो देशवासीयांना भेडसावणार्‍य र्‍या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करण्याकरिता कटिबद्ध असल्याची शपथ घेतली आहे.

 
 
 
Haffkine Institute for Training, Research and Testing