माहितीच्या कायद्याअंतर्गत माहिती
 
Dr. Waldemar Mordecai Haffkine
 
हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परेल, मुंबई - ४०००१२.
 

* अधिकारी आणि कर्मचार्‍य र्‍यांचे अधिकार व कर्तव्ये :

संचालक :

संचालक हा संस्थेचा प्रशासकीय प्रमुख आहे. संस्थेमध्ये काम करणार्‍य र्‍या सर्व कर्मचार्‍य र्‍यांचा आणि विभागाचा तो मुख्य आहे.

* संस्थेत चालणार्‍य र्‍या सर्व कामकाजांवर देखरेख.

* मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि विभाग प्रमुख यांचे सहकार्याने संस्थेच्या विविध विभागांमध्ये चालणार्‍य र्‍या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण आणि मार्गदर्शन.

* नियामक परिषदेच्या सभेमध्ये सचिव म्हणून कामकाज पाहणे.

* शासनाला खालील बाबींसंबंधाने सर्व प्रकारचा सल्ला देणे.

* कर्मचार्‍य र्‍यांच्या नियुक्त्या आणि बदल्या.

* संस्थेतील अधिकार्‍य र्‍यांचे वर्तन आणि सेवा शर्ती.

* ग्रॅट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई

* सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबई

* गोकूळदास तेजपाल रुग्णालये, मुंबई

* कामा व आल्बलेस रुग्णालय, मुंबई यांना सूक्ष्मजीव विज्ञान सल्लागार म्हणून काम पाहणे.

* शासनाच्या वतीने संस्थेच्या प्रशासनाकरता अर्थसंकल्प अंदाजामध्ये सुचविलेल्या खर्चावर नियंत्रण राखणे.

*वेळोवेळी शासनाला लागणारे सर्व अहवाल आणि माहिती वेळेवर सादर करणे.

*शासनाची मंजुरी ग्राह्य धरून साथीच्या रोगांच्या प्रादुर्भावाची चौकशी व संशोधन करण्याकरिता त्याच्या सहाय्यकांची नेमणूक करणे. जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा प्लेग प्रतिबंधक लस टोचण्यासाठी सक्षम कर्मचार्‍य र्‍यांची नेमणूक करणे.

* मुंबई विद्यापीठ कायदा, १९५३ च्या कलम ५२ अन्वये विद्यापीठाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संस्थेला मान्यता मिळालेली असून संस्थेच्या प्रमुखपदी असणारे संचालक हे मुंबई विद्यापीठाच्या विद्वत्ता सभेचे पदसिद्ध सभासद असतात.

 

* मुख्य प्रशासकीय अधिकारी :

_ संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये संचालकांना साहाय्य करणे.

_ कार्यकारी समितीचा सदस्य सचिव म्हणून काम पाहणे.

_ कर्मचार्‍य र्‍यांना विविध स्वरूपाच्या रजा संमत करणे.

_ कर्मचार्‍य र्‍यांना दक्षता रोध पार करण्यासंबंधीचा अधिकार.

_ अधिकारी व कर्मचार्‍य र्‍यांना चर्चासत्रे, परिसंवाद इत्यादींना उपस्थित राहण्याकरिता तसेच दैनिक भत्ता मिळण्याकरिता संमती देणे.

_ क्षुल्लक कामकाजाकरता मुक्त निविदांचे प्रस्ताव स्वीकारण्याबाबतचा अधिकार.

_ शुल्लक कामकाजांच्या नगांमधील वाढ किंवा त्यांच्या निर्देशामधील दुरुस्ती किंवा अधिकच्या बाबींसाठीचे दर संमत करणे.

_ शुल्लक कामकाजासाठी निविदा, निविदेची जाहिराती जारी करणे, निविदा स्वीकारणे, करारनाम्यावर सही करणे.

_ वाहनांकरिता भाड्याचे दर ठरविणे.

_ अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार दुरुस्तीवरील खर्च, कार्यालयीन यंत्रसामुग्रीची निगा खर्च संमत करणे.

_ कार्यालयीन लेखनसामुग्री तसेच इतर विभागांना आवश्यक असणार्‍य र्‍या सामुग्रीच्या खरेदीकरिता खर्च करण्यासाठीचा अधिकार.

_ जाहिरातींच्या प्रकाशनावरील खर्च करण्याचा आणि देयके प्रमाणित करण्याचा अधिकार

_ कर्मचार्‍य र्‍यांकडून घेतलेल्या सेवा- करार, हमी पत्रांची अंमलबजावणी करणे.

घरभाडे, सेवा- आकार इ. ठरविण्याचा अधिकार.

पोस्ट आणि टेलिग्राफ विभागाच्या नियमांनुसार टेलिफोनची मासिक देयके आणि आकाराचे भुगतान करणे.

_ कार्यालयीन कामाकरिता मुंबईतील स्थानिक प्रवासासाठी बस / रेल्वे / टॅक्सी भाडे संमत करणे.

_ लेखा अधिकार्‍य र्‍याच्या सल्ल्याने न्यायालयीन आदेश किंवा कायदा आणि नियमांच्या आधारे देय होत असलेली नुकसान भरपाई संमत करणे.

क्षुल्लक बांधकामाच्या कामकाजांचे दावे संमत करणे.

_ कंत्राटाच्या शर्तीनुसार बांधकामाच्या कंत्राटदारांवर ( नागरी / विद्युत / तांत्रिक ) दंडात्मक कार्यवाही करणे.

_ हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चांचणी संस्थेच्या नियमानुसार अधिकारी वगळून इतर संवर्गातील पदांच्या तात्पुरत्या बदल्याच्या जागांच्या नेमणुका करणे अशा व्यक्तींची वेतन श्रेणी निश्चित करणे.

_ विविध पदांच्या नेमणुकीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे संचालकांकडून संमत करण्यात आलेले निवड आदेश जारी करणे.

_संचालकांकडून संमत करण्यात आलेले विभागीय उमेदवारांचे बढती आदेश जारी करणे.

_ संचालकांच्या संमतीच्या अधीन राहून प्रतिनिधित्व, प्रशिक्षण, पुरस्कार वितरण आणि इतर सर्व आस्थापना विषयक बाबींचे आदेश जारी करणे.

_ विभाग प्रमुखांच्या शिफारसी प्रमाणे कर्मचार्‍य र्‍यांना गणवेश आणि इतर सुरक्षात्मक कपड्यांच्या वितरणास मंजुरी देण्याचे अधिकार.

 

लेखा अधिकारी :

_ संस्थेचे लेखा विषयक कामकाज पाहणे आणि अंदाजपत्रक वितरणासंबंधीचे अधिकार

_ नियमांच्या अधीन राहून.

_ निवृत्तीवेतन आणि इतर निवृत्ती लाभाविषयकचे अधिकार

_ कर्मचार्‍य र्‍यांची सेवा पुस्तके सांभाळण्यासंबंधीचे अधिकार.

_ नियमांच्या अधीन राहून दैनिक भत्ता देण्यासंबंधीचे अधिकार.

वेतन देयके, प्रवास खर्च देयके, उचल देयके, जी. पी. एफ देयके, ओ. टी. देयके आकस्मिक खर्च देयके इ. प्रमाणित करण्यासंबंधीचे अधिकार.

_ विभागाला आवश्यक असणार्‍य र्‍या कार्यालयीन लेखन सामुग्री आणि इतर बाबींच्या खरेदीवर खर्च करण्याचे अधिकार.

_ वार्षिक लेखा - सारीणी बनविणे.

_ शासकीय अंदाजपत्रक आणि विनियोग लेखा.

 

कार्यालय अधीक्षक :

_ मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि संचालक यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात साहाय्य करणे.

_ संस्थेच्या अंतर्गत आणि बाह्य कामकाजावर देखरेख करणे.

_ संस्थेला प्राप्त होणार्‍य र्‍या संपूर्ण टपालाची दैनंदिन छाननी करून ते मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि संचालक याना सादर करणे.

_ दैनंदिन आस्थापना आणि प्रशासनिक कामकाजावर ( उदा. कार्यालयीन आदेश, पत्रे, टिप्पणी आणि इतर पत्रव्यवहार ) देखरेख ठेवणे.

_ संस्थेच्या नियमानुसार नेहमीच्या कामकाजाविषयी मुख्य प्रशासकीय अधिकार्‍य र्‍यांना टिप्पणी सादर करणे.

_ कर्मचारी संघटनेविषयक बाबी पाहणे आणि प्रशासनाकडे येणार्‍य र्‍या तक्रारी, गा-हाणी, विनंती अर्ज यांचेवर टिप्पणी लिहिणे.

_ संस्थेच्या नियामक परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्याकरता नियामक परिषद तसेच इतर अंतर्गत समितीच्या सभासदांच्या नेमणुकीचे नूतनीकरण इ. प्रकारचे प्रस्ताव सादर करणे.

कार्यकारिणी समितीच्या बैठकींचे आयोजन आणि सादर बैठकांत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य प्रशासकीय अधिकार्‍य र्‍यांना साहाय्य करते.

_ संस्थेशी संबंधीत विधान सभेमध्ये मांडले जाणार्‍य र्‍या प्रश्नांची तयारी करून शासनाला सादर करण्या करिता उत्तरे बनविणे.

_ संस्थेच्या वाहनाचे व्यवस्थापन करणे आणि त्यांच्या दुरुस्ती आदींची व्यवस्था करणे.

वेळोवेळी संचालक, मुख्य प्रशासकीय अधिकारी आदींनी दिलेली गोपनीय आणि महत्त्वाची कामे पार पाडणे.

 

* भांडार अधीक्षक :

_ भांडार विभागातील सर्व कामकाजावर देखरेख

_ निविदा चौकशीपत्रे तुलनात्मक तक्ते आणि आदेश बनविणे व जारी करणे.

_ देशांतर्गत खरेदी आणि आयात करावयाच्या वस्तूं संबंधीत पत्रव्यवहार, बँक व्यवहार, उत्पन्न कर, कस्टम ड्यूटी सूट, संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत मान्यता मिळविणे.

खरेदी समितीसाठीचे प्रस्ताव बनविणे.

_ माल प्राप्तीसाठीची प्रमाणपत्रे जारी करणे.

_ स्थानिक खरेदी तसेच आयात करावयाच्या बाबीसंबंधी पाठपुरावा करणे.

_ पी. डी. ए. आयात इ. बाबतची कागदपत्रे सांभाळणे.

 

विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग :

_ संचालकांच्या सल्ल्याने विभागातील कामकाजातील नियंत्रण करणे.

_ विभागामध्ये चांचण्या, संशोधन आणि प्रशिक्षण संबंधाने कामे हाती घेणे.

_ विभागातील दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे आणि संबंधितांना मार्गदर्शन करणे.

_ विभागाचा वार्षिक अहवाल आणि जमा-खर्चाचे अंदाजपत्रक बनवून संचालकांना सादर करणे.

_ संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये योगदान करणे.

 

विभाग प्रमुख, चिकित्सालयीन विकृतीशास्त्र विभाग आणि जीव रसायनशास्त्र विभाग :

_ संचालकांच्या सल्ल्याने विभागातील कामकाजाचे नियंत्रण करणे.

_ नियंत्रणामध्ये चांचण्या, संशोधन आणि प्रशिक्षण संबंधाने कामे हाती घेणे.

 

विभाग प्रमुख :

_ औषधशास्त्र, विषविज्ञान आणि बायोऍव्हॅबिलीटी संशोधन विभाग.

_ संचालकांच्या सल्ल्याने विभागातील कामकाजाचे नियंत्रण करणे.

_ नियंत्रणामध्ये चांचण्या, संशोधन आणि प्रशिक्षण संबंधाने कामे हाती घेणे.

 

विभाग प्रमुख विषाणूशास्त्र आणि प्रतिक्षमता शास्त्र विभाग :

_ संचालकांच्या सल्ल्याने विभागातील कामकाजाचे नियंत्रण करणे,

_ नियंत्रणामध्ये चांचण्या, संशोधन आणि प्रशिक्षण संबंधाने कामे हाती घेणे.

 

विभाग प्रमुख प्राणीजन्य मानवी रोगशास्त्र विभाग :

_ संचालकांच्या सल्ल्याने विभागातील कामकाजाचे नियंत्रण करणे.

_ नियंत्रणामध्ये चांचण्या, संशोधन आणि प्रशिक्षण संबंधाने कामे हाती घेणे.

 

मध्यवर्ती उपकरण कक्ष :

_ संचालकांच्या सल्ल्याने विभागातील कामकाजाचे नियंत्रण करणे.

_ वेळोवेळी संस्थेच्या विविध उपकरणाची निगा आणि दुरुस्ती कार्यक्रम आवश्यकतेप्रमाणे हाती घेणे.

_ विभागाच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे आणि संबंधितांना मार्गदर्शन करणे.

_ विभागाच्या वार्षिक अहवाल आणि जमा-खर्चाचे अंदाजपत्रक बनवून संचालकांना सादर करणे.

_ संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये योगदान देणे.

 

तंत्र सहाय्यक :

_ विभागातील संवर्ग ३ आणि संवर्ग ४ मधील कर्मचार्‍य र्‍यांच्या कामावर देखरेख आणि मार्गदर्शन करणे.

_ संस्थेच्या भांडार विभागाने पुरवठा केलेल्या कायम वस्तू नोंदवहीतील वस्तू, अवजारे आणि कच्च्या मालसंबंधित कामावर देखरेख करणे.

_ विभागातील नित्याचे चांचण्यात्मक आणि संशोधनात्मक काम पार पाडणे.

_ विभागामध्ये इतर आवश्यक तांत्रिक कामे हाती घेणे.

_ विभागाच्या प्राणीगृहाशी संबंधीत कामांवर देखरेख ठेवणे.

_ वेळोवेळी विभाग प्रमुख आणि इतर वरिष्ठांनी दिलेली कामे पूर्ण करणे.

 

कार्यालय सहाय्यक :

_ टपालाची छाननी करून संबंधितांकडे रवानगी करणे.

_ कर्मचार्‍य र्‍यांचे रजा आदेश वरीष्ठांना सादर करणे आणि सदरच्या नस्ती सांभाळणे.

_ आस्थापना विषयक इतर कामाच्या बाबी पाहणे.

_ कार्यालय अधीक्षकास त्याच्या दैनंदिन कामकाजामध्ये साहाय्य करणे.

_ संस्थेच्या सर्व कर्मचार्‍य र्‍यांच्या संबंधित व्यक्तिगत नस्ती सांभाळणे.

_ किरकोळ नगद उचलीशी संबंधीत हिशोब ठेवणे आणि त्याची नोंदवही सांभाळणे.

_ कार्यालयीन कामकाजाशी संबंधीत विविध नस्त्या सांभाळणे.

 

प्रयोगशाळा परिसर :

_ विभागामध्ये स्वच्छता राखणे.

_ विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये असणारी शास्त्रीय अवजारे, टेबले आदींची दैनंदिन स्वच्छता करणे.

_ विभागामधील अधिकारी आणि इतर कर्मचार्‍य र्‍यांना त्यांच्या दैनंदिन तांत्रिक कामामध्ये सहाय्यक करणे.

_ विभागाला प्राप्त झालेले चाचण्यांकरिताचे नमुने संबंधित अधिकार्‍य र्‍यांकडे पोहचविणे.

_ विभागाच्या आवश्यकतेप्रमाणे भांडार विभागाकडून वेळोवेळी सामान, शास्त्रीय अवजारे इ. घेऊन येणे.

_ वेळोवेळी विभागातील दुरुस्त्यांकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ज्ञांना बोलविणे.

_ वेळोवेळी विभाग प्रमुख आणि इतर वरीष्ठांनी दिलेली कामे पार पाडणे.

 
 
Previous
 
Haffkine Institute for Training, Research and Testing