माहितीच्या कायद्याअंतर्गत माहिती
 
Dr. Waldemar Mordecai Haffkine
 
हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परेल, मुंबई - ४०००१२.
 

* निर्णय घेण्याची कार्यपद्धती :

_ कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना त्यासंबंधीची संपूर्ण माहिती संबंधितांकडून खालील प्रमाणे मार्गस्थ करण्यात येते. तसेच एखाद्या निर्णय घेण्यात आल्यानंतर त्याची योग्य ती अंमलबजावणी धोरणात्मक करून सर्व संबंधितांना कळविण्यात येते.

 

नियामक परिषद

कार्यकारी समिती

संचालक

उप संचालक

सहाय्यक संचालक

मुख्य प्रशासकीय अधिकारी

विभाग प्रमुख

इतर कर्मचारी

* कामाचे निष्कर्ष :

प्रत्येक पदाची संबंधीत कार्ये, कर्तव्ये आणि अधिकारी यांची पद्धतशीर नोंद घेण्यात आली असून दैनंदिन तत्त्वावर त्यांची अंमलबजावणी पाहिली जाते. मागील वर्षभरात केलेले कामकाज आणि इतर कार्ये त्यांचेवर आधारीत वार्षिक अहवाल प्रत्येक विभागाने दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. अशा रीतीने प्राप्त झालेल्या सर्व अहवालांचे संकलन करून त्यांचा समावेश संस्थेच्या वार्षिक अहवालामध्ये करण्यात येतो.

कर्मचार्‍य र्‍यांनी त्यांची दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी वापरायवयाचे नियम;

संस्थेने त्याकरिता " हाफकीन संस्थेची विभागीय कार्यप्रणाली " नावाची एक नियमावली तयार केली आहे. कर्मचार्‍य र्‍यांची सर्व कामे, आणि कर्तव्ये या नियमावलीत उद्धृत करण्यात आलेल्या नियम आणि सूचनांचे आधारे पाडण्यात येतात.

 

कागदपत्रांच्या वर्गवारीचे विवरणपत्र :

संस्थेकडे प्राप्त झालेल्या तसेच संस्थेने इतरत्र केलेला पत्र- व्यवहार विषयांनुसार वर्गवारी करून संबंधीत नस्त्यांमध्ये विभागणी करून काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यात येतो. सर्व नस्त्यांचे खालील चार प्रकारामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे.

१) शासनाची संबंधीत पत्रव्यवहार

२) विद्यापीठाशी संबंधीत पत्रव्यवहार

३) जनतेबरोबर पत्रव्यवहार

४) कर्मचार्‍य र्‍यांच्या व्यक्तिगत नस्ती.

 

धोरण तयार करण्याच्या किंवा अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये जनतेच्या सहभागासाठी केलेली उपाययोजना :

जनतेचा कोणीही प्रतिनिधी / व्यक्ती संस्थेच्या मुख्य प्रशासकीय अधिकार्‍य र्‍यांना त्यांच्या / तिच्या सूचना, तक्रारी इत्यादी कळविण्यासाठी व्यक्तिशः : किंवा पत्रव्यवहाराद्वारे कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधू शकतो. अशारीतीने प्राप्त झालेल्या सूचना संचालकांना कळविण्यात येतात. संचालक सदर बाबींवर कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये चर्चा घडवून आणतात आणि बैठीत पारित झालेल्या निर्णयांवर अंतिम संमती मिळविण्याकरता नियामक परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो.

 

८) सल्ला देण्याकरिता स्थापन केलेली मंडळे / समित्या / परिषद :

हाफकीन संस्थेच्या सुसंगत कार्यप्रणाली स्थापन करण्यात आलेल्या समित्या :

१- नियामक परिषद

२- कार्यकारी समिती

३- संस्थेअंतर्गत पशू विषयक नैतिकता समिती

४- संस्थेअंतर्गत नैतिकता समिती

५- खरेदी समिती

६- ग्रंथालय समिती

७- संशोधन विषयक सल्लागार परिषद

८- विभागीय पदोन्नती समिती

९- निवासव्यवस्था समिती

१०- रद्द बातल बाबी विषयक समिती

या समित्यांचे कामकाज पूर्णपणे संस्थेअंतर्गत असले तरी देखील या समित्यांच्या बैठकींचे सभावृत्ते, सनदशीर मार्गाने मागणी केल्यास आम जनतेच्या प्रतिनिधीस उपलब्ध करून दिली जातात.

 

९) अधिकारी कर्मचार्‍य र्‍यांची निर्देशक :

०१) संचालक, डॉ. अभय स. चौधरी
उप संचालक - रिक्त
सहा. संचालक - श्री. एल. एस. पाटील. रसायन चांचणी प्रयोगशाळा

०२) मुख्य प्रशासकीय अधिकारी- रिक्त

०३) लेखा अधिकारी -

०४) भांडार अधीक्षक, श्री. सुधाकर सावंत

०५) कार्यालय अधीक्षक, श्री. प्रभाकर माने

०६) विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग - श्री. एस. पी. गजभिये

०७) विभाग प्रमुख - चिकीत्सालयीन विकृतीशास्त्र, जीव रसायनशास्त्र विभाग, विषविज्ञान, विषाणूशास्त्र व वसतिगृह डॉ. अभय चौधरी

०८) विभाग प्रमुख : प्राणीजन्य मानवी रोगशास्त्र विभाग : श्री. एल. एस. पाटील

०९) विभाग प्रमुख औषधशास्त्र, बायोऍव्हेबिलीटी विभाग

 
 
Previous
 
Haffkine Institute for Training, Research and Testing